HomeनांदेडAtrocity section : पाचोंदा दलित महिला दुहेरी हत्याकांडा मध्ये ऍट्रॉसिटी कलमवाढ करावी

Atrocity section : पाचोंदा दलित महिला दुहेरी हत्याकांडा मध्ये ऍट्रॉसिटी कलमवाढ करावी

माहूर/नांदेड| माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दोन सख्या जावांचा खून करून सोने लुटल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी मयतांच्या स्वतः च्या शेतात घडली होती. कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांचे पाचोंदा दुहेरी खून प्रकरणातील आरोपी विरोधात ऍट्रॉसिटी कलम वाढ करावी म्हणून मयत महिलांच्या दोन मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर १२ फेब्रुवारी पासून नऊ दिवस आमरण उपोषण केले आहे.

पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी उपोषणार्थीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाचव्या दिवशी उपोषणार्थी नागेंद्र अडागळे व विकास अडागळे या दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करावे लागले होते. बौध्द समाजातील अंतकला आडागळे आणि अनुसयाबाई आडागळे या सख्या दोघी जावांचा निर्घृन खून करून गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने चोरून नेले होते. यातील दोन आरोपीना पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १२ तासाच्या आत अटक करण्यात आली होती.

यातील एक आरोपी गजानन येरजवार हा पाचोंदा गावाजवळील गावचा रहिवासी असून त्याचे नेहमीसाठी पाचोंदा येथे येणेजाने होते. तो मयत महिलांना पूर्वीपासून ओळखत होता. असा लेखी जवाब गावातील सरपंच विलास तोरकड व इतर प्रतिष्ठित लोकांनी पोलीस ठाणे माहूर येथे लेखी स्वरूपात ३० नोव्हेंबर रोजी दिला आहे. दोन्हीही मयत महिलांच्या मुलांनी दि.१५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक माहूर यांना लेखी निवेदन देऊन खुनातील आरोपी विरुद्ध ऍट्रॉसिटी व मोका गुन्हा दाखल करून कलम वाढ करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे.

प्रचलित कायद्यानुसार मयत महिलांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक माहूर कलमवाढ करण्यात उदासीन असल्यामुळे खून झालेल्या दोन्हीही महिलांच्या मुलांनी नामे नागेंद्र साहेबराव आढागळे व विकास अशोक आढागळे रा. पाचोंदा ता.माहूर यांना संरक्षण व पुनर्वसन मिळणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते त्या उपोषणास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डीवायएफआयच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

पीडित उपोषणार्थिंच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देखील उपरोक्त पक्ष संघटनेने दिला होता. अद्याप ऍट्रॉसिटी कलम वाढ झाली नसल्याने तातडीने कलम वाढ करून मयत महिलांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा म्हणून डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने ९ मार्च सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. राहूल नरवाडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.  

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments