नवीन नांदेड| जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे नवीन प्रवेशित मुलांचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदरील सोहळा डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर हे होते प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. नरेंद्र चव्हाण व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते तसेच मंचावर माननीय श्री गव्हाणे प्रा.डॉ. प्रा.डॉ.यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर.मुजावर यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून मा.श्री.नरेंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करताना मा.श्री. म्हणाले की युवक हा सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असला पाहिजे त्याला स्वतः मधल्या सर्व कौशल्यांची जाणीव असली पाहिजे तरच जीवनात सर्व उत्तम गोष्टी करता येतील.


आपल्याकडे जर सर्व ज्ञान कौशल्य व दृष्टिकोन असतील आपल्याला करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतील. पण ते सर्व मिळवण्यासाठी युवकांनी खूप कष्ट व मेहनत करण्याची गरज आहे प्रत्येकाने चौकटीबाहेरचा विचार आजच्या युगात केला पाहिजे तरच तो स्पर्धेत टिकू शकेल स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तसेच युवकांनी शोधून काढले पाहिजेत व अर्थार्जन केले पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने करण्यास युवकांनी शिकले पाहिजे तरच तो नोकरी देणारा युवक होईल व स्वतःसोबतच कुटुंब व समाजाचा विकास करेल असे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. यानंतर प्राचार्य डॉक्टर डब्ल्यू .आर.मुजावर यांनी विद्यार्थ्यांना समाजकार्य अभ्यासक्रमातील संधी तसेच सकारात्मक जीवनासाठी कसा करावा व त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नेहमी यश संपादन करण्याची क्षमता विकसित करायला पाहिजे.


डिग्री ही नोकरीसाठी नाही तर शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आहे. सर्व प्रकारचे ज्ञान कौशल्य व तंत्र शिकण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे त्यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डॉ.निरंजनकर सरदार यांनी केले सूत्रसंचालन प्रा गोपाळ बडगिरे यांनी केले यावेळी सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी प्रा डॉ.मनीषा मांजरमकर, प्रा.डॉ.नरहरी पाटील, प्रा.डॉ. विद्याधर रेड्डी, प्रा. डॉ. दिलीप कठोडे, प्रा.डॉ. प्रतिभा लोखंडे, प्रा.डॉ. शेख ए.ए., प्रा डॉ. वरगंटे सत्वशीला, प्रा.गोईनवाड सुनील, ग्रंथपाल सुनील राठोड, राजेश पाळेकर, सुनील कंधारकर, नरेंद्र राठोड, संतोष मोरे, गणेश तेलंग त्याचबरोबर विध्यार्थी यांची उपस्थिती होती.


