Narendra Chavan ; युवकांनी सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असले पाहिजे – नरेंद्र चव्हाण – NNL
नवीन नांदेड| जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे नवीन प्रवेशित मुलांचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदरील सोहळा डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर हे होते प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. नरेंद्र चव्हाण व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते तसेच मंचावर माननीय श्री गव्हाणे प्रा.डॉ. प्रा.डॉ.यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर.मुजावर यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून मा.श्री.नरेंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करताना मा.श्री. म्हणाले की युवक हा सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असला पाहिजे त्याला स्वतः मधल्या सर्व कौशल्यांची जाणी...
