नांदेडमहाराष्ट्र

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक’

नांदेड| वारंवार सूचना व माहिती देऊन ही नांदेड शहरातील जवळपास २ हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. (Sanjay Gandhi Niradhar Yojana) त्यामुळे पुढील सात दिवसात ही कारवाई न केल्यास या महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात तहसील कार्यालयाने निवेदन स्पष्ट केले असून आधार कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार शिबिरे घेण्यात आली.मात्र तरीही अनेक जण आधार कार्डला आपले बँक खाते जोडू शकलेले नाहीत. योजनेतील पारदर्शीतेसाठी व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्ड सोबत बँकेचे खाते जोडले जाणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे दोन हजारावर लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतील विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी जसे की गांधी निराधार,विधवा,अपंग, दुर्धर योजना,श्रावणबाळ,इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना येतात. 65 वर्षाखालील निराधार लोकांना या योजनेतील लाभ प्रामुख्याने भेटतो. महाराष्‍ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍तीवेतन योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्‍यांना बॅंक/पोस्‍ट खाते आधार क्रमांकाशी संलग्‍न केल्‍यानंतरच अर्थसाहाय्याचे वाटप करण्‍याबाबत शासन पत्रानुसार कळविण्‍यात आले आहे.

शिबीर घेतले तरी दुर्लक्ष
तहसिल या कार्यालयाने यापूर्वी अनेक वेळा आधार बॅंक खात्याशी सलंग्‍न करण्‍यासाठी कार्यालयात कॅम्‍प आयोजित केला होता. जाहीर आवाहन महानगरपालिका यांचे 6 क्षेत्रिय कार्यालय तसेच वृत्‍तपत्राद्वारे व या कार्यालयाचे तलाठ्यांचे कार्यालय येथे प्रसिध्‍द केलेले होते. मात्र तरीही प्रतिसाद नाही.

सात दिवसाची मुदत
मात्र तरीही शिल्‍लक लाभार्थ्‍यानी अदयाप पर्यंत त्‍यांनी आपले खाते आधारशी संलग्‍न करून घेतले नसून कार्यालयात संबंधीत कागदपत्रे देखील जमा केलेली नाहीत .सबब पुढील सात दिवसाच्‍या आत आपले बॅंक/पोस्‍ट खाते आधारशी संलग्‍न करून घेण्‍यात यावे. तसे न केल्‍यास आपले अनुदान वितरीत करता येणार नाही याची नोंद घ्‍यावी. याची सर्वस्‍वी जबाबदारी लाभार्थ्यची राहील.

कागदपत्रेही जमा करावी
यादीत नमुद लाभार्थ्‍यांनी आपले बॅंक खात्‍याची पहिल्‍या पानाची पासबुकची झेरॉक्‍स, अदयावत आधार कार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे जाहीर प्रगटनाच्‍या प्रसिध्‍दी पासून सात दिवसाच्‍या आत कार्यालयीन वेळेत जमा करावे. जे लाभार्थी विहित मुदतीमध्ये आपले वरील प्रमाणे कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावर जमा करता येणार नाही. यास लाभार्थी स्‍वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्‍यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
संजय गांधी व तत्सम योजनेतील लाभार्थी ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणाऱ्या अत्यल्प आर्थिक गटातील बहुतेक निराधार असतात. यामध्ये प्रामुख्याने निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादी लाभार्थ्यांचा सहभाग असतो त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी त्यांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संजय वरकड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button