देगलूर, गंगाधर मठवाले| शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी सपोनि संकेत वसंतराव दिघे, दिपक प्रल्हादराव जोगे, शरद शेरिकर, खाजगी इसम याना 40,000/- हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचासमक्ष 20,000/- रुपयाची लाच स्विकारली. या प्रकरणी पो.स्टे मरखेल, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीची पोलीस विभागातील लाचखोर अधीकारी व कर्मचाऱ्याच्या खळबळ उडाली आहे.

घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, यातील तक्रारदार यांची मौ. मरतोळी, ता. देगलुर येथील शेत गट क्र. 101/1 चे शिवारात 1 हेक्टर वडीलोपार्जीत शेती आहे. नमूद शेतीमध्ये त्यांचे शेताचे शेजारी शेत असलेल लोक वारंवार अडथळा आणत असल्याने त्यांनी मा. दिवाणी न्यायालय, देगलूर यांच्याकडून मनाई हुकूम प्राप्त करून घेतला होता. नमूद दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूम घेवून तक्रारदार यांनी पो.स्टे. मरखेल येथे जावून त्यांचे शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत सपोनि संकेत दिघे यांना विनंती केली.

त्यावरून सपोनि दिघे यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 40,000/- रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर बीट जमादार पोह/दिपक जोगे यांनी तक्रारदार यांना सपोनि दिघे साहेबांनी 40,000/- रूपये सांगितले आहे, तुम्ही पैसे द्या असे म्हणुन गुन्हयास प्रोत्साहन दिले. त्यावेळी पोह/दिपक जोगे व तक्रारदार यांच्यात तड़जोड़ होवून पोह/जोगे यांनी मागितलेल्या 40,000/- रूपया पैकी 20,000/- रूपये स्विकारण्याचे मान्य करून खाजगी इसम शरद रामदास शेरिकर यांचे मोबाईलचे फोन पे वर पाठविण्यास तक्रारदार यांना भाग पाडले.

तरी यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचे चौकशीमध्ये सपोनि श्री संकेत दिघे, पोह/दिपक प्रल्हाद जोगे यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेता शेजारील लोकांवर दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूमाचे आदेशावरून प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 40,000/- रूपये लाचेची मागणी करून 20,000/- रूपये खाजगी इसमाचे मोबाईल फोन पेवरून स्विकारले म्हणून पो.स्टे मरखेल, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सापळा कार्यवाही संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड मो.क्र. 9545531234,मा.डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र नांदेड मो.क्र. 9923701967, पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, मो.क्र. 9870145915 यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड यांनी केली.
या कार्व्हिंगनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ दुरध्वनी 02462-253512 टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले.