Anti-Corruption Department : 20 हजारांची लाच स्विकृती करणाऱ्या सपोनीसह त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही -NNL
देगलूर, गंगाधर मठवाले| शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी सपोनि संकेत वसंतराव दिघे, दिपक प्रल्हादराव जोगे, शरद शेरिकर, खाजगी इसम याना 40,000/- हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचासमक्ष 20,000/- रुपयाची लाच स्विकारली. या प्रकरणी पो.स्टे मरखेल, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीची पोलीस विभागातील लाचखोर अधीकारी व कर्मचाऱ्याच्या खळबळ उडाली आहे.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, यातील तक्रारदार यांची मौ. मरतोळी, ता. देगलुर येथील शेत गट क्र. 101/1 चे शिवारात 1 हेक्टर वडीलोपार्जीत शेती आहे. नमूद शेतीमध्ये त्यांचे शेताचे शेजारी शेत असलेल लोक वारंवार अडथळा आणत असल्याने त्यांनी मा. दिवाणी न्यायालय, देगलूर यांच्याकडून मनाई हुकूम प्राप्त करून घेतला होता. नमूद दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूम घेवून तक्रारदार यांनी पो.स्टे. मरखेल येथे जावून त्यांचे शेता शेज...
