HomeनांदेडMrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल...

Mrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन – NNL

नांदेड l पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी काल शनिवारी येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा मध्ये जाऊन माथा टेकला.

मुख्यमंत्र्यांच्या आई किती साधेपणाने दर्शन घेतात त्याचा प्रत्यय नांदेड येथील गुरुद्वारामध्ये आला. कुठलाही सुरक्षेचा लवाजवामा न दाखवता त्यांनी सर्वसामान्य यात्रे करून प्रमाण गुरुद्वारे जाऊन दर्शन घेतले. श्री गुरुगोविंदसिंग जी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या नांदेड नगरीत येऊन आपल्याला धन्य वाटले. येथील गुरुद्वारा चे प्रमुख पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ यांची यांनी भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. गुरुद्वाराच्या निष्काम सेवेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

गुरुद्वारा लंगर साहिब चे मुखी संत बाबा नरेंद्रसिंग जी तथा संत बाबा बलविंदरसिंग जी यांच्या कार्याचे श्रीमती हरपाल गोरे यांनी कौतुक केले. त्यांच्या सोबत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रल्हाद भालेराव, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे व श्रेयस कुमार बोकारे हे होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments