Sanguchiwadi ; संगुचीवाडी येथील नागरिकांचा इतर गांवानी आदर्श घ्यावा

उस्माननगर l कंधार तालुक्यातील मौजे संगुचीवाडी येथील दानशुर शिक्षणप्रेमी यांनी एकत्र येऊन शाळेला नवीन इमारत बाधत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट असुन परिसरातील सुजाण नागरिकांनी या गावातील नागरिकांचा आदर्श घ्यावा असे मत बिलोली येथील केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी व्यक्त केले.

उस्माननगर केंद्राच्या वतीने सूर्यकांत जाधव यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सगुचीवाडी येथे उस्माननगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत नारायणराव जाधव हे नियत वयोमानानुसार दि 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम दि.1/7/2025 रोजी उस्माननगर केंद्राच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख जयवंतराव काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. विद्या वांगे , दत्ता गादेकर , राहुल सोनसळे , दौलत पांडागळे , पाटील सर गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य शिक्षण प्रेमी नागरीक उपस्थित होते .

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन झाले . शाळेच्या वतीने इंग्रजी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . उस्माननगर केंद्राच्या वतीने सूर्यकांत नारायणराव जाधव यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला .

यावेळी साहेबराव शिंदे , एकनाथ केंद्रे , गौतम सोनकांबळे पाटील , देविदास डांगे , उद्योजक येईलवाड , सूर्यकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी जयवंतराव काळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना श्री सूर्यकांत नारायणराव जाधव सर यांनी सेवाकाळात विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी व्यवसाय निष्ठा सांगीतली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सगुचीवाडी शाळेला नविन ईमारत गावकरी मंडळी गावाच्या वर्गणी गोळा करून बांधत आहेत याचे कौतुक करून हा आदर्श परिसरातील गावकरी मंडळीनी घ्यावा असे आव्हान केले.

संगुचीवाडी शाळेतील गुणवत्ता व शिक्षकांची मेहनत गावकऱ्यांचे सहकार्य पाहून बाहेर गावाचे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे त्याबद्दल गावकऱ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती मुंढे यांनी केले .प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ सीमा जोशी यांनी केले .तर आभार जयश्री गायकवाड यांनी मांडले .
सुरुची भोजनानंतर कार्यक्रमांची सांगता झाली.या सोहळ्यास उस्माननगर बिट अंतर्गत येणाऱ्या जि.प. व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद , प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button