Sanguchiwadi ; संगुचीवाडी येथील नागरिकांचा इतर गांवानी आदर्श घ्यावा
उस्माननगर l कंधार तालुक्यातील मौजे संगुचीवाडी येथील दानशुर शिक्षणप्रेमी यांनी एकत्र येऊन शाळेला नवीन इमारत बाधत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट असुन परिसरातील सुजाण नागरिकांनी या गावातील नागरिकांचा आदर्श घ्यावा असे मत बिलोली येथील केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी व्यक्त केले.
उस्माननगर केंद्राच्या वतीने सूर्यकांत जाधव यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सगुचीवाडी येथे उस्माननगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत नारायणराव जाधव हे नियत वयोमानानुसार दि 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम दि.1/7/2025 रोजी उस्माननगर केंद्राच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख जयवंतराव काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. विद्या वांगे , दत्ता ग...
