A Strom Caused ; नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर शहर तालुक्यात वादळी वाऱ्याने मारला तुफान फेरफटका

हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्याने दिनांक 5 में रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानकपणे तुफान फेरफटका मारला आहे, या अति वेगवान वाऱ्यामुळे शहर परिसरातील व शेतातील, व्यापारी, लग्न समारंभाच्या खरेदीसाठी आलेले नागरिक हैराण झाले होते.



सोमवारी अचानक वादळी वाऱ्याने शिरकाव केल्याने अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेली असून, विविध ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजतारा तुटून जमीनिवर पडल्या, त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर शहरातील मार्केट भागात वाऱ्यामुळे धुळीचे लोट दुकानात शिरल्याने अक्षरशः दुकानदारानी रात्र होण्यापूर्वी वैतागून शटर लावल्याचे दिसून आले आहे, वादळी वाऱ्याने लावण्यात आलेले नाम फलक, शुभेच्छा बॅनर उडून गेली तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जनावरांना खाण्यासाठी जमून ठेवलेले वैरण व परहट्या उडून गेल्या आहेत.


वादळी वाऱ्याने तर शहरातील मुख्य प्रमुख रस्त्यावर प्लास्टिक आणि केरकचऱ्याचा खच आल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या लास्टिक मुक्त शहर अभियानाची पोल खुलली आहे, वादळी वाऱ्याने उडालेल्या धुळीमुळे नागरिकांना अक्षरशः तोंडाला रूमाल बांधून रस्ता पार करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एकूणच हवामान खात्याने विदर्भात सतर्कतेचा इशारा दिला त्याचे परिणाम विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर व ग्रामीण भागात दिसून आला असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.





