नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील ट्रेनस ऑन डिमांड (TOD) DEMU गाड्यांचे पुनर्नंबरीकरण आणि सुधारित ट्रेनच्या वेळेची घोषणा केली आहे. रेल्वेने कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी तात्काळ प्रभावाणे लागू करण्यात येत आहे.

खालील रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल करण्यात आला आहे – पूर्णा-जालना डेमु गाडी क्रमांक 07181 हा बदलून 07281 करण्यात आला आहे. जालना-नांदेड डेमु गाडी क्रमांक 07182 हा बदलून 07282 करण्यात आला आहे. जालना-नांदेड डेमु गाडी क्रमांक 07282 च्या वेळेत दिनांक 7 जानेवारी 2025 पासून पुढील आदेश प्राप्त होई पर्यन्त बदल करण्यात आला आहे.
