लोहा। सुनेगाव तलावाच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नदीपात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे . पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती पाहता लवकरच खोलीकरणाचे काम सुरू होईल व संरक्षक भिंत व शहरात विविध विकास कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सांगितले तसेच त्यांनी स्वतः नदीपात्राची पाहणी केली.


लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावाचा मुख्य स्रोत जुन्या शहरातून वाहणारी भीमा नदी होय. या नदीला गोलेगाव, हाडोळी, बेनाळ व परिसरातून छोटे मोठे ओहळ , नाले वाहत मिसळतात. जुन्या शहरातील कलालपेठ भागात या नदीचे पात्र अरुंद व उथळ झाले आहे. त्यामुळे.रानची आई ( गावालगत असलेल्या भागाचे नाव) भागातून पावसाळ्यात पुराचे पाणी आंबेडकर नगर साठे गली भागात शिरते .त्यामुळे अनेकदा काही कुटुंबाना हलवावे लागते.


मान्सूनपूर्व कामाना प्राधान्य देण्याचा सूचना मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी संबधित विभागाना दिल्या आहेत .त्यांनी स्वतः जुन्या शहरातील कलालपेठ भागातील नदी पात्राची पाहणी केली आणि नदी खोलीकरणाच्या सूचना दिल्या आहेत.


बुद्धविहार बांधकामाची पाहणी
जुन्या शहरा आमदार प्रतापराव ।पाटील चिखलीकर याच्या निधीतून दीड कोटी रुपये खर्चून बुद्ध विहार होत आहे त्या कामाची मुख्याधिकारी यांनी पाहणी केली.
२५ कोटीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना
आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरात २५ विविध विकास कामांसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अंदाज पत्रके तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना दिल्या. त्यांनी तात्काळ शहर अभियंता शरद राहेरकर याना जुन्या शहरातील नदीपात्रालगत संरक्षक भिंत यासह विविध कामाचे इस्टिमेट तयार करावेत असे आदेशीत केले आहे .बुद्ध विहार परिसरात अद्यावत अभ्यासिका उभारण्याचा मनोदय व्यक्त करत मुख्याधिकारी यांनी त्याचेही अंदाजपत्रक तयार करण्याचे सांगितले.



