HomeनांदेडSand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन,...

Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील कौडगाव, येळी, व चिंचोली गोदावरी नदी पात्रातून इंजिन व तराफ्याच्या साह्याने व बिहारी मजुरांकडून अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, उस्माननगर पोलीस व महसूलच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दि.२० मे रोजी पहाटेपासून बोटीच्या सहाय्याने नदी पात्रातून प्रवास करत ३ घाटावरून ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा व टिप्पर जप्त केला आहे.

दरम्यान उस्माननगर पोलीसात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवार पहाटेपासून सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होती. बिहारी मजूर मात्र पोलिसांना पाहताच पसार झाले आहेत.

IMG 20250522 WA0034 Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

लोहा महसूल व कापसी बुद्रुक मंडळाअंतर्गत येळी, कौडगाव व चिंचोली येथील गोदावरी नदी पात्रातून इंजिन व तराफ्याच्या साह्याने बिहारी मजुरांमार्फत अवैध वाळू उपसा सुरूच होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, उस्माननगर पोलीस व कापसी महसुल पथकाने नदीपात्रातून बोटीने प्रवास करत वाळू उपसा करणारे येळी, कौडगाव व चिंचोली घाटातील उपरोक्त वाहने, इंजिन जप्त करुन उस्माननगर पोलिसांच्या ताब्यात दिली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी व उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, गजानन गाडेकर, मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, महसूल अधिकारी मोतीराम पवार, लक्ष्मण गोधणे, संतोष अस्कुलकर, पोलीस जमादार अशोक हंबर्डे, अप्पाराव वरपडे व पोलिसांचा फौजफाटा होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments