Wednesday, May 13

Tag: tipper seized

Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील कौडगाव, येळी, व चिंचोली गोदावरी नदी पात्रातून इंजिन व तराफ्याच्या साह्याने व बिहारी मजुरांकडून अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, उस्माननगर पोलीस व महसूलच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दि.२० मे रोजी पहाटेपासून बोटीच्या सहाय्याने नदी पात्रातून प्रवास करत ३ घाटावरून ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा व टिप्पर जप्त केला आहे. दरम्यान उस्माननगर पोलीसात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवार पहाटेपासून सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होती. बिहारी मजूर मात्र पोलिसांना पाहताच पसार झाले आहेत. लोहा महसूल व कापसी बुद्रुक मंडळाअंतर्गत येळी, कौडगाव व चिंचोली येथील गोदावरी नदी पात्रातून इंजिन व तराफ्याच्या साह्याने बिहारी...
error: Content is protected !!