नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड पोलीसा कडुन 24 तासाचे आत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस ( Within 24 hours, two cases of forcible theft were detected) आणुन, आरोपी कडुन एक सोन्याची अंगठी (वजन 10 ग्राम) व नगदी रक्कम 10,500/-रुपये असा एकुण 80,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

घटनेची सविस्तर हकीकत अशी कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक 17/01/2025 रोजी 19.30 वाजताच्या सुमारास जागृत हनुमान मंदीर यशवंतनगर नांदेड येथे फिर्यादी हे दर्शन घेवून मंदीरात प्रार्थना करीत थांबले होते, यावेळी तीन अनोळखी इसमांनी येवून फिर्यादी यांचा काठीने गळा आवळून व धाक दाखवुन त्यांचे हाताचे बोटातील सोन्याची आंगठी वजन 10 ग्रॅम किंमत 70,000/- रुपये व पॅन्टचे खिशातील नगदी रक्कम 7000/- रुपये असा एकुण 77,000/- रुपयाचा ऐवज जबरीने चोरून नेला वगैरे फिर्याद वरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गुरनं 37/2025 कलम 309 (4), 3 (5) भारतीय न्याय संहिता-2023 प्रमाणे दाखल असून तपास पो. उपनि. विनोद देशमुख यांचे कडे देण्यात आला होता.

तसेच दिनांक 16/01/2025 रोजी 13.00 वाजलाचे सुमारास यातील फिर्यादी हे कॉलेज परीसरातील बांधावरुन पायी घराकडे जात असताना तीन अनोळखी ईसमाने अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवुन व गालावर चापट मारुन त्यांच्या खिशातील नगदी रक्कम 3500/- रुपये जबरीने चोरुन नेले वगैरे फिर्याद वरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गूरनं 37/2025 कलम 309 (4),3(5) भारतीय न्याय संहिता-2023 प्रमाणे दाखल असुन तपास पो. उपनि. नरेश वाडेवाले यांचे कडे देण्यात आला होता.

वरील प्रमाणे दोन्ही गुन्हे घडले असल्याची माहीती मिळताच तात्काळ रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकातील पो. उपनि विनोद देशमुख, पोउपनि नरेश वाडेवाले, पोहेकॉ. प्रदिप गर्दनमारे, पोहेकों. गजानन किडे, पोहेकॉ. वाडीयार, पोहेकों. विशाल माळवे, पोकों. विष्णुकांत मुंडे, पोकों. सुर्यभान हासे व चालक पोकों. तांबोळी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड असे मिळून शासकीय वाहनाने रवाना होवुन पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, सदरचे गुन्हे वरील आरोपीतांनी केल्याची माहीती मिळताच गुप्त माहीतीचे आधारे तपासाची चक्र गतीने फिरवुन आरोपीतांचा शिताफिने शोध घेवुन जिराईत मैदान जंगमवाडी नांदेड येथे दिनांक 18/01/2025 रोजी शुभम आनंद राठोड वय 18 वर्ष राहणार बजाजनगर नांदेड, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, अभय नारायण कांबळे वय 18 वर्ष राहणार एकतानगर, नांदेड, आर्यन राहुल परांडे वय 18 वर्ष राहणार लोकमित्रनगर, नांदेड, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक सोन्याची अंगठी वजन 10 ग्रॅम किंमत 70,000/- रुपये व नगदी रक्कम 10,500/- रुपये असा एकूण 80,500/-रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवुन त्याचे कडुन नमुद 02 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्वाचे कौतुक केले आहे.
