हिमायतनगर। हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत रविवार ता. १९ भारत टॅलेंट सर्च परिक्षा उत्साहात पार पडली आहे.


स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षा या विषयीचे ज्ञान प्राप्त व्हावे, म्हणून या परीक्षेकडे पाहीले जात आहे. राज्यस्तरावरून गुणवंत विद्यार्थ्यांना इसरो, राष्ट्रपती भवन, विज्ञान भवन, अशी शैक्षणिक सहल घडवून या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपरोक्त सुविधा देण्यात येणार आहेत. रविवारी पार पडलेल्या भारत टॅलेंट सर्च बि. टी. एस. या राज्यस्तरीय परिक्षेत २१९ विद्यार्थी सहभागी झाले होते. अशी माहीती केंद्र संचालक बि. टी. एस. तथा तालूका समन्वयक कु. ज्योतीताई बनसोडे यांनी दिली.

पर्यवेशक म्हणून अमोल पतंगे, मोहिनी हनवते, सपना चिटेवार, प्रदिप नरहारे, संदिप पतंगे, प्रवेश वाडेकर, मनिषा बनसोडे, रविकुमार शिराणे, सौ. सिमा गोखले, यांनी काम पाहिले. तर त्यांना जि. प. केंद्रीय कन्या शाळेचे मु. अ. एस. एन. कदम, सहशिक्षक पी. एम. बनसोडे, सहशिक्षक पी. एस. वंजारी यांचे विशेष सहकार्य मिळाले असून सदरची बि.टी. एस. परिक्षा उत्साहात पार पडली असल्याचे संचालिका कु. ज्योतीताई बनसोडे यांनी सांगीतले.
