नवीन नांदेड l नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी तिरूपती पाटील घोगरे तर कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर यांच्यी बिनविरोध निवड करण्यात करण्यात आली.

गतवर्षीचे मावळते अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या एक वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्या नंतर नव्याने कार्यकारिणी निवडीसाठी 19 जानेवारी रोजी हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली यावेळी नव्याने अध्यक्षपदासाठी अनिल धमणे व तुकाराम सावंत यांनी तिरूपती पाटील घोगरे यांच्यी अध्यक्षपदी साठी नाव जाहीर केल्यानंतर उपस्थित सर्वांनी संमती दिल्यानंतर उर्वरित कार्यकारणीत कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर, उपाध्यक्षपदी शाम जाधव, कोषाध्यक्ष सारंग नेरलकर, सचिव निळकंठ वरळे,तर सल्लागार म्हणून तुकाराम सावंत ,किरण देशमुख,अनिल पाटील धमणे यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी वेगवेगळ्या उपक्रमासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. निवडी नंतर हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर निवडीबद्दल नव्याने घोषीत कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
