theft were detected : 24 तासाचे आत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; आरोपी कडुन 80 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त
नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड पोलीसा कडुन 24 तासाचे आत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस ( Within 24 hours, two cases of forcible theft were detected) आणुन, आरोपी कडुन एक सोन्याची अंगठी (वजन 10 ग्राम) व नगदी रक्कम 10,500/-रुपये असा एकुण 80,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक 17/01/2025 रोजी 19.30 वाजताच्या सुमारास जागृत हनुमान मंदीर यशवंतनगर नांदेड येथे फिर्यादी हे दर्शन घेवून मंदीरात प्रार्थना करीत थांबले होते, यावेळी तीन अनोळखी इसमांनी येवून फिर्यादी यांचा काठीने गळा आवळून व धाक दाखवुन त्यांचे हाताचे बोटातील सोन्याची आंगठी वजन 10 ग्रॅम किंमत 70,000/...
