नांदेडराजकीयव्हिडीओ

MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगांव हिमायतनगर विधानसभा २०२४ च्या निवडणूक रिंगणात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर उतरले आहेत. आजपासून त्यांच्या प्रचारांला सुरुवात करण्यात आली असून, हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर, शिवपती महादेव, मानाच्या वडाच्या गणपतीचे दर्शन घेऊन बुधवारी सकाळी ७ वाजता प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. फटाक्याची अतिशबाजारी करत हिमायतनगर शहरातील प्रचार कार्यालयांच उदघाटन करून प्रचार दौऱ्याला धुमधडाक्यात सुरुवात आली आहे.

IMG 20241106 070456 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 070233 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 065910 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

याप्रसंगी मंचावर उपस्थित श्यामराव देशमुख सरसमकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गणेशराव शिंदे, विठ्ठल ठाकरे, परमेश्वर गोपतवाड आदींनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडणूक काळात गाफील न राहता अंग झटकून स्वतः उमेदवार समजून काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना निवडणून आणण्यासाठी व जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची शपथ घेतली. तसेच मतदानाच्या दिवशी मतपेट्या सीलबंद होईपर्यत डोळ्यात तेल घालून काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20241106 074214 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 073354 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 072826 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

प्रचार कार्यालयाचा उ‌द्घाटन सोहळा संपल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर समोरून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. हिमायतनगर शहरातील गणेशवाडी, बोरगडी येथील मारोतीरायाच दर्शन, बोरगडी तांडा नं. 1 व तांडा नं.२, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, खैरगाव, खैरगाव तांडा, लाईन तांडा, रमनवाडी, गोधनतांडा, सिबदरा (ज.), वडगाव (ज.), वडगाव तांडा, चिंचोर्डी, महादापूर, जिरोना, दगडवाडी, गणेशवाडी तांडा, सवना (ज.), वाशी, एकघरी, पार्डी, बाऱ्हाळीतांडा आदी गावातील मतदार नागरिकांच्या भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात आमदार जवळगावकर यांच्या प्रचार दौरा येताच ठिकठिकाणी ढोल तश्या व बेण्डबाजाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. प्रचार दौऱ्यात वाहनाचा ताफा, कार्यकर्त्यांची गर्दी पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. प्रचाराची गती शेवटपर्यंत टिकवून ठेवत वाढली पाहिजे असा चंग कार्यकर्त्यांनी बांधून प्रचारात उडी घेतली असल्याचे कार्यकर्त्यांच्या उत्साही चेहऱ्यावरून दिसून आले आहे.

IMG 20241106 070902 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 070621 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

IMG 20241106 071221 MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, सुभाष दादा राठोड, रामराव सूर्यवंशी, विठ्ठलराव वानखेडे, सुभाष शिंदे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, गोविंद बंडेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, फेरोजखान युसुफखान पठाण, डॉ प्रकाश वानखेडे, अनंतराव देवकते, सरदार खान पठाण, बाकी सेठ, कॉम्रेड दिगंबर काळे, योगेश चिलकावार, दीपक कात्रे, बाळू आणा चवरे, अमोल धुमाळे, प्रकाश रामदिनवार, संदीप तुपतेवार, पंडित ढोणे, मन्नान भाई, कानबा पोपलवार, सोपान बोंपिलवार, सचिन माने, काकडा दिंडीतील वारकरी भजनी मंडळी आदींसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!