नांदेडमहाराष्ट्र

Kinwat railway station : किनवट रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, प्लॅटफॉर्म क्र. २ साठी अप्रोच रोड व पार्किंगचा अभाव

किनवट | किनवट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पूर्व बाजूस जाण्यासाठी योग्य अप्रोच रोड, वाहन पार्किंग व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भाजप किनवट शहरच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

किनवट हे परिसरातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग व वृद्ध प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. मात्र, प्लॅटफॉर्म क्र. २ कडे जाण्यासाठी योग्य रस्ता, पार्किंग व्यवस्था व आवश्यक सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे.

याशिवाय, शिवाजी नगर रेल्वे अंडरब्रिजजवळील काम अद्याप अपूर्ण असल्याने व निकृष्ट केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे परिसरात धूळ उडत असून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करून धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

FB IMG 1770818479089 Kinwat railway station : किनवट रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, प्लॅटफॉर्म क्र. २ साठी अप्रोच रोड व पार्किंगचा अभाव

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी, प्लॅटफॉर्म क्र. २ साठी त्वरित अप्रोच रोड उपलब्ध करून देणे, वाहन पार्किंगची सुविधा निर्माण करणे, शिवाजी नगर अंडरब्रिजचे काम तातडीने पूर्ण करणे, प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, अशी मागणी भाजप किनवट शहरच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा असंतोष वाढण्याची शक्यता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!