Homeनांदेडविविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम आदिवासी बहुल व अविकसित समजल्या जाणाऱ्या व जेमतेम 721 मतदान असणाऱ्या इरेगाव सारख्या खेडेगावाने आता विकासाची कात टाकली . गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्गम भागात असणाऱ्या इरेगाव सारख्या गावांना विकासापासून कोसोदूर राहावे लागले होते.

IMG 20240702 WA0035 विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

त्यातच ग्रामपंचायतला पुरेसा निधी मिळत नसल्याने या गावाच्या विकासास चालना मिळत नव्हती. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये येथील लोकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. व चिखलातून रस्त्याची वाट काढावी लागत होती. त्यातच येतील महिला सरपंच सौ रत्नमाला अमोल गोरे उपसरपंच श्रीराम गंटलवाड गावचे ग्रामसेवक जी एन धसकनवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 30 लाख रुपये चा रस्ते बांधकामासाठी निधी प्राप्त झाला.

IMG 20240702 WA0032 विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

त्याचबरोबर पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालय ही विविध विकासकामे या खेडेगावात आली. त्यातच गावातील तरुण आणि प्रतिष्ठित व्यक्तींची त्यांना साथ मिळाली त्यातून विकासात चालना मिळाल्याची या खेडेगावला संधी प्राप्त झाली. त्यामुळे या खेडे गावाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत झाली म्हणजे काय वावगे ठरणार नाही. त्यातच गावात होत असलेले विकासाची कामे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. व दिनांक 29 रोजी विकासात्मक कामे पाहून ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा सरपंचाचा उपसरपंचाचा सत्कारही केला. ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments