Friday, May 15

Tag: at Kinwat railway station is on the agenda

Kinwat railway station : किनवट रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, प्लॅटफॉर्म क्र. २ साठी अप्रोच रोड व पार्किंगचा अभाव

Kinwat railway station : किनवट रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, प्लॅटफॉर्म क्र. २ साठी अप्रोच रोड व पार्किंगचा अभाव

नांदेड, महाराष्ट्र
किनवट | किनवट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पूर्व बाजूस जाण्यासाठी योग्य अप्रोच रोड, वाहन पार्किंग व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भाजप किनवट शहरच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. किनवट हे परिसरातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग व वृद्ध प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. मात्र, प्लॅटफॉर्म क्र. २ कडे जाण्यासाठी योग्य रस्ता, पार्किंग व्यवस्था व आवश्यक सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. याशिवाय, शिवाजी नगर रेल्वे अंडरब्रिजजवळील काम अद्याप अपूर्ण असल्याने व निकृष्ट केल्यामुळे नागरिकांना ...
error: Content is protected !!