नांदेडराजकीय

Yoga Camp ; लोह्यात – प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या योग शिबिरास प्रचंड प्रतिसाद

लोहा। आजच्या बदलत्या धावपळीच्या काळात स्वास्थ्य निरोगीमय असायला पाहिजे त्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार असायला पाहिजे. दररोज सकाळी योगा केल्याने शरीर सदृढ व उत्साही असते दिवसभर मनावरील ताणतणाव कमी होण्यास याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनी व्यायामा सोबतच दररोज अभ्यास करावा एक योगा पृथ्वीसाठी व एक शरीरासाठी होतो. असे मार्गदर्शन भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.

लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राणिताताई देवरे चिखलीकर याच्या प्रमुख उपस्थितीत अकराव्या जागतिक योगदिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य योग शिबिरास मार्गदर्शक करताना प्राणिताताई म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देश व जागतिक पातळीवर योगाला नेले आज लाखो लोकांना याच फायदा होत आहे. रामदेव बाबांनी योग घराघरात पोहचविला आहे .दररोज सकाळी मॉर्निग वॉक करणारे योगा करतातच तसेच … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या योग दिवसात सहभाग घेतला आहे राज्यासह देशभरात उत्साहात योगाचे शिबिर पार पडले .२०१९ मध्ये नांदेड शहरात जगातील योग दिन जिल्ह्याचे तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या पुढाकाराने झाला होता.

त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आज या शाळेत शहरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शरीर व मन सदृढत्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. एक योगा शहरासाठी व पृथ्वीसाठी असे संस्थेचे अध्यक्ष केरबाजी बिडवई, सांगून संचालक लक्ष्मीकांत बिडवई याच्या सहकार्याने हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले .विद्यार्थ्यांनी व्यायाम व अभ्यास नियमितपणे केला पाहिजे असे मार्गदर्शन प्राणिताताई यांनी केले.

योग शिबिरास कार्यक्रमाचे अध्यक्ष केरबा सावकार बिडवई,श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज नाणीजधाम यांचे शिष्य ,भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव शोभाताई बगडे, माजी. नगरसेविका कल्पनाताई मुकदम, माजी .संचालक कांता बिडवई , प स .सदस्या सुरेखा वाले, अलका कनकदंडे, मुख्याध्यापक अनिल हामदे, प्राथमिक चे मुख्याध्यापक तांबोळे बि.डी. जाधव योगगुरु दिपक भातलवंडे , डॉ. सविता घंटे,संजीवनीताई गाढे,शिक्षण विस्तार अधिकारी एमबंलवाड मॅडम, सचिन मूकदम, गणराज केंद्रे पर्यवेक्षकएच.जाधव सर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button