Yoga Camp ; लोह्यात – प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या योग शिबिरास प्रचंड प्रतिसाद
लोहा। आजच्या बदलत्या धावपळीच्या काळात स्वास्थ्य निरोगीमय असायला पाहिजे त्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार असायला पाहिजे. दररोज सकाळी योगा केल्याने शरीर सदृढ व उत्साही असते दिवसभर मनावरील ताणतणाव कमी होण्यास याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनी व्यायामा सोबतच दररोज अभ्यास करावा एक योगा पृथ्वीसाठी व एक शरीरासाठी होतो. असे मार्गदर्शन भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राणिताताई देवरे चिखलीकर याच्या प्रमुख उपस्थितीत अकराव्या जागतिक योगदिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य योग शिबिरास मार्गदर्शक करताना प्राणिताताई म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देश व जागतिक पातळीवर योगाला नेले आज लाखो लोकांना याच फायदा होत आहे. रामदेव बाबांनी योग घराघरात पोहचविला आहे .दररोज सकाळी मॉर्निग...
