Dr. Shekhar Dordallu (Dorewad) ; स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती काही असो, प्रयत्न प्रामाणिक असावेत – नवनिर्वाचित डॉ शेखर डोरडल्लु (दोरेवाड)

नांदेड l किनववट तालुक्यातील अंदबोरी या गावातून नवनिर्वाचित एमबीबीएस डॉक्टर शेखर भोजन्ना डोरडल्लु (दोरेवाड) यांचं सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. गोल्ला गोलेवार यादव समाजातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रात अखेर, शेखर डोरडल्लु यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अत्यंत गरीब परिस्थिती मध्ये डॉ शेखर बनला डॉक्टर.आई वडील शेतकरी अत्यंत हलाखीची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये कठोर परिश्रम मेहनत जिथे चिकाटीच्या जोरावर शेखर डॉक्टर प्रचंड मेहनतीने जिद्द असल्याने आणि शिक्षणामध्ये ध्येयवेडेपणा डॉक्टर म्हणून यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली आहे.

वडील शेतकरी, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच डॉक्टर होणाचे स्वप्न होते अन् अखेर शेखर भोजन्ना डोरडल्लु दोरेवाड या मुलाने अतिशय मेहनत करून अभ्यास करून चिकाटीने आई वडिलांचे नावलौकिक केले आहे, शेखर यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्कार होत आहे.

डॉ.शेखर भोजन्ना डोरडल्लु (दोरेवाड)
प्रयत्न आणि चिकाटीतून यशाला गवसणी घालता येते, हे ग्रामीण भागातल्या मुलांना निश्चितच प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आपली संगत ही चांगल्या मित्रांसमवेत असली पाहिजे. मुलांनी व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. परिस्थितीची जाणीव असावी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. आई-वडील शिकले नाहीत, मात्र मला कष्टाने शिकविले.

आज त्यांचे पांग फेडल्याचे समाधान मिळाले आहे. मला मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणास्थान पांडुरंग दिगंबर भैरेवाड बोरगडीकर व सर्वांचा मी ऋणी आहे. 2019 मध्ये झालेल्या नेट या परीक्षेसाठी देशभरातून लाखो गुणवंत विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत घेऊन आपले नशीब आजमावत असतात.

डॉ.शेखर यांनी समाजाचे व किनवट तालुक्याचे नाव मोठं केलं – पांडुरंग भैरेवाड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अंदबोरी येथील शाळेत डॉ शेखर प्राथमिक शिक्षण झाले. डॉ शेखर यांनी एका सामान्य कुटुंबातल्या मुलाने यश मिळवल्यामुळे त्याचं कौतुक आहे. विशेषतः एका शेतकरयांच्या मुलानं देशातल्या मोठ्या परीक्षेत नावलौकिक मिळवल्यामुळे नांदेड जिल्हाचे देखील नाव मोठं झालं आहे. गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे आदरणीय श्री.भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेकजी बकेवाड, सुभाषराव शिल्लेवाड, शहर अध्यक्ष श्याम सेठ जक्कलवाड, बाबाराव जरगेवाड,पण कौतुक केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button