आरोग्यनांदेड

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेली पूरग्रस्त गाव शैलगाव बु व खु ग्रामपंचायत, तालुका अर्धापूर येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे.

गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगनवाडी यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींनाची गृहभेटी द्वारे माहिती घेऊन तपासणीसाठी ग्रामपंचायत मध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी सुरू केलेल्या ओ.पी.डी मध्ये आजारी रुग्णांना पाठविण्यात यावे. गावात ओ.पी.डी च्या ठिकाणी आवश्यक उपचार करण्यात येत आहे. सदरील गावात आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत किटक शास्त्रीय कंटेनर सर्व्हेक्षण करुन एच. आय.बी.आय. नुसार कार्यवाही व टिमीफास टाकने .

IMG 20240904 WA0060 Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा - डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

गावात मेडोकलोर घरोघरी वाटप करणे. गावात अति जोखीमचा व्यक्ती उच्च रक्तदाब, मधुमेह, कुपोषित बालके यांची तपासणी करण्यासाठी ग्राम पंचायत मध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी सुरू केली आहे. शेलगाव गावात पूरग्रस्त घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कुटूंबानी काय काळजी घ्यावी या बाबतीत आरोग्य शिक्षण दिले. गावातील पाणी स्तोत्र प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी TCL द्वारे शुध्दीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना सांगितले आहे. तसेच नांदेड जिल्हमधील मधील एकुण २० पूरग्रस्त गावांमध्ये २४ तास वैद्यकीय आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा यांना आदेश दिले आहे. त्या गावात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनिक अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी डॉ श्रीकांत देशमुख तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर, आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल गोखले व कर्मचारी उपस्थित होते.

IMG 20240904 WA0061 Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा - डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!