Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL
नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेली पूरग्रस्त गाव शैलगाव बु व खु ग्रामपंचायत, तालुका अर्धापूर येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे.
गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगनवाडी यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींनाची ग...
