क्राईमनांदेड

City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई

नांदेड| नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदार यांनी दिनांक 15 जुलै 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई केली आहे.

IMG 20250716 WA0032 City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई

1) पोलीस स्टेशन विमानतळ सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान फाईन वाईन मार्ट परीसरात 04 इसम हे मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्याचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

2) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान ढवळे कॉर्नर परीसरात 05 इसम पाणी बॉटल ग्लास विकताना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 68 म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

IMG 20250716 WA0026 City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई

3) पोलीस स्टेशन भाग्यनगर सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान छत्रपती चौक व किनवट वाईन शॉप परीसरात 08 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच मालेगाव रोडवर 02 इसम विना नंबर प्लेटचे वाहन चालवित असताना मिळून आल्याने त्यांचे वाहणे पोस्टे येथे नेवून त्यांचेवर मोटार वाहन कायदा प्रमाणे कारवाई करून एकुण 1000/- रू चा दंड आकारण्यात आला आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

IMG 20250716 WA0033 City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई

4) पोलीस स्टेशन वजिराबाद सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रोडवर 01 इसम विना नंबर प्लेटचे वाहन चालवित असताना मिळून आल्याने त्याचे वाहण शहर वाहतूक शाखा वजिराबाद येथे नेवून त्याचेवर मोटार वाहन कायदा प्रमाणे कारवाई करून एकुण 500/- रू चा दंड आकारण्यात आला आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

5) पोलीस स्टेशन इतवारा सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान जुना मोंढा परीसरात 04 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

IMG 20250716 WA0027 City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई

6) दामिनी पथक दामिनी पथका मधील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान विसावा गार्डन परीसरात 02 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जनतेला आवाहन केले कि, नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये तसेच दारू पिणा-यासाठी जागा उपलब्ध करून देवू नये व सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अन्यथा संबधीत इसमांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!