Homeक्राईमMukramabad police raid ; मुक्रामाबाद पोलीसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर...

Mukramabad police raid ; मुक्रामाबाद पोलीसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर कारवाई

नांदेड| मुक्रामाबाद पोलीसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या ठिकाणी छापा मारून पाच जणांवर कारवाई करुन 1 लक्ष 27 हजर 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची अवैद्य जुगार अड्डे चालकाच्या खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे दिलेल्या आदेशावरून सपोनि राजु चव्हाण, पोस्टे मुक्रामाबाद यांनी दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पथकासह गस्त घालीत असतांना मौ. रावी येथील एका शेतात लिंबाचे झाडाखाली विना परवाना बेकायदेशिररित्या काही जण झन्ना मन्ना, तिरंट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने छापा टाकला.

यावेळी तिथे जगदीश गवते, लक्ष्मण आलापुरे, तुळशीराम जोरले, बालाजी देवकत्ते, ज्ञानोबा येळगे सर्व राहणार रावी ता मुखेड हे पाचजण जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांचेकडे नगदी व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लक्ष 27 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचा समक्ष जप्त करुन जुगार खेळणाऱ्याना पोलीस स्टेशन मुक्क्रामाबाद येथे आणुन कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. मुक्रामाबाद पोलीस पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करुन उत्कृष्ट कामगीरी केल्याने अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments