City Street Safety Team : सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई
नांदेड| नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदार यांनी दिनांक 15 जुलै 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि विना नंबरप्लेट वाहणांवर कारवाई केली आहे.
1) पोलीस स्टेशन विमानतळ सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान फाईन वाईन मार्ट परीसरात 04 इसम हे मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्याचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.
2) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण सिटी स्ट्रिट ...
