Islapur ; अहो ऐकलत का आश्चर्य! इस्लापूर ग्राम विकास आराखड्यानुसार 55 लक्ष रुपयांची विकासात्मक कामे ही बोगस झाल्या प्रकरणी सरपंचांनीच केली तक्रार

किनवट, परमेश्वर पेशवे l इस्लापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकास आराखड्यानुसार जवळपास 55 लक्ष रुपयांची कामे हि निकृष्ट दर्जाची करून लाखो रुपयाचा निधी हडप करून संमती पत्रावर व आराखड्यावर सरपंचाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार इस्लापूर येथील सरपंच सौ शारदा अनिल शिनगारे यांनी किनवट गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्याने किनवट तालुक्यात एकच खळबळ उडाली. इस्लापूर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या बनावट सह्या करून लाखो रुपयाचा निधी हडप केला जातो व त्यात भ्रष्टाचार केला जातो तर इतर खेडे गावच्या सरपंचाचे काय महन्याची पाळी आता खुद्द प्रशासनावर येऊन ठेपली आहे!

इस्लापूर येथील सरपंच सौ शारदा अनिल शिनगारे यांनी दिनांक 28/ 3 /2025 रोजी किनवट गटविकास अधिकाऱ्याकडे इस्लापूर जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या व इरेगाव रोडवरील सिमेंट रस्त्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार दिल्यानंतर किनवट गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांना सदरील प्रकरणाची तीन दिवसात चौकशी करण्याची आदेश दिले खरे पण गटविकास अधिकाऱ्याचे पत्र प्राप्त होऊन जवळपास पंधरा दिवस झाले पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. याप्रकरणी संबंधित एजन्सी धारकांना कामासंदर्भात विचारणा केली असता सदरील पूर्ण कामे ही शासनाच्या नियमाच्या अधीन राहून केली असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यातच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता एस एन पाटील यांच्याशी वर्ग खोल्याच्या कामासंदर्भात विचारणा केली.

असता सदरील कामे ही शासनाच्या अंदाजपत्रकानुसार करण्यात आली असून सदरील कामे दर्जेदार स्वरूपाची झाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली .त्यातच इस्लापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जिनेवाड यांच्याशी शाळेतील विकासात्मक कामासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेतील दोन्हीही वर्ग खोल्याची कामे ही दर्जेदार स्वरूपाची झाली असल्याची कबुली खुद्द जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिली.

त्यामुळे खरेच या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला का ? हे शोधणे पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यासाठी एक संशोधनाचा विषय बनला आहे. काही का असेना इस्लापूर सरपंचाची तक्रार ही किनवट तालुक्यामध्ये एक चर्चेचा विषय बनली आहे. अहो ऐकलं का आश्चर्य म्हणण्याची खुदपाळी आता गटविकास अधिकाऱ्यांवर आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button