नांदेड। आज पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये श्रीकांत पाटील व त्यांच्या पत्नी हे रेल्वेस्टेशन ते छत्रपतीचौक ऑटोने प्रवास करुन छत्रपतीचौक येथे उतरले. काही वेळाने त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिणे असलेली पर्स सदर ऑटो मध्ये विसरल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे येवुन कळविले होते.
त्यावरून श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक प्रमुख विनोद भा. देशमुख पोहेकों/२३६४ वाडीयार व प्रो.पो.उपनि शिंदे यांना सदर अॅटोचा शोध घेण्याचे आदेशित केले. वरील अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ सदर पर्स मधील मोबाईलचे लोकेशन घेवून ऑटो चा पाठलाग केला व सदर ऑटो रेल्वेस्टेशन परिसरामध्ये मिळून आल्याने त्यातील पर्स ताब्यात घेतली.
सदर पर्स पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे आणुन पर्स बाबत खात्री केली असता त्यामध्ये VIVO कंपणीचा मोबाईल किंमती १४,०००/-रुपये, ०३ तोळे सोन्याचे दागिणे किंमती २,१०,०००/-रुपयाचे, नगदी ५,०००/- रुपये, घराच्या व लॉकरच्या चाव्या, बँकेचे ATM व इतर कागदपत्रे असा एकुण २,२९,०००/-रुपयाचा मुद्देमाल व पर्स असे श्रीकांत पाटील यांना परत करण्यात आले आहे. सदर उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्वांचे कौतूक केले आहे.