Homeनांदेडनिवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स...

निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण – NNL

नांदेड| लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी नांदेड येथे काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लावून वृक्षारोपण केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. शिंदे, उपप्राचार्य अरुणा शुक्ला, इ.एम खिल्लारे, वनविभागाचे बेदरकर, महाविद्यालयाचे संशाधन अधिकारी विशाल मराठे, प्रा. अश्विनी बोरीकर, प्रा. रंजन राठोड, प्रा. विनायक चव्हाण आदीची उपस्थिती होती.

यावर्षीच्या मे महिन्यात उन्हामुळे खूप गरम वातावरणात होते. त्यावेळी सर्वजण वृक्षारोपण करण्याबाबत बोलत होते. परंतु आता पाऊस पडल्यानंतर सर्वजण या गोष्टीला विसरुन गेले आहेत. आता वृक्ष लावण्यासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी खूप चांगले वातावरण असून आपण सर्वानी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्रयत्न केले पाहिजे. पावसाळयाच्या काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्याने आजूबाजूचा परिसर हिरवागार होईल असे मत निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी व्यक्त केले.

WhatsApp Image 2024 07 03 at 2.00.19 PM निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण - NNL

निवडणूक खर्च अधिकारी डॉ. दिनेश कुमार जांगिड हे निवडणूक कामासाठी आतापर्यत जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वृक्षारोपणाचा केले आहे. यापूर्वीही ते उत्तरप्रदेशच्या रायबरेली आणि छत्तीसगढच्या कोंडागाव येथेही त्यांनी वृक्षारोपणाच केले आहे अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी दिली. यावेळी सायन्स महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या एक वृक्ष आईच्या नावाने या अभियानात 10 वृक्षाची लागवड केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments