Islapur ; अहो ऐकलत का आश्चर्य! इस्लापूर ग्राम विकास आराखड्यानुसार 55 लक्ष रुपयांची विकासात्मक कामे ही बोगस झाल्या प्रकरणी सरपंचांनीच केली तक्रार
किनवट, परमेश्वर पेशवे l इस्लापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकास आराखड्यानुसार जवळपास 55 लक्ष रुपयांची कामे हि निकृष्ट दर्जाची करून लाखो रुपयाचा निधी हडप करून संमती पत्रावर व आराखड्यावर सरपंचाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार इस्लापूर येथील सरपंच सौ शारदा अनिल शिनगारे यांनी किनवट गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्याने किनवट तालुक्यात एकच खळबळ उडाली. इस्लापूर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या बनावट सह्या करून लाखो रुपयाचा निधी हडप केला जातो व त्यात भ्रष्टाचार केला जातो तर इतर खेडे गावच्या सरपंचाचे काय महन्याची पाळी आता खुद्द प्रशासनावर येऊन ठेपली आहे!
इस्लापूर येथील सरपंच सौ शारदा अनिल शिनगारे यांनी दिनांक 28/ 3 /2025 रोजी किनवट गटविकास अधिकाऱ्याकडे इस्लापूर जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या व इरेगाव रोडवरील सिमेंट रस्त्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याची...
