Mahur Gadachi My Renuka : नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ भव्य संगीत महोत्सवाचे मंगळवारी आयोजन

नांदेड| महाकवी संत विष्णूदास यांच्या रसाळ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या रचनांवर आधारित ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा भव्य संगीत महोत्सव मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ५ वाजता या सांस्कृतिक पर्वाला सुरुवात होणार असून, महोत्सवातील रचनांना सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र माहूर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. याच माहूर नगरीत महाकवी संत विष्णूदास यांची समाधी असून, त्यांच्या निवडक भक्तिरचनांचा हा संगीत महोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा आणि संगीताचा सुरेल संगम ठरणार आहे.

या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राहणार असून, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, आयुक्त महेश कुमार डोईफोडे तसेच संपादक शंतनू डोईफोडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक व निवेदकांच्या सहभागाने हा संगीत महोत्सव रसिकांसाठी अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभूती देणारा ठरणार आहे. या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button