
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या धावत्या भेटीचा कार्यक्रम आज संपन्न झाला.


या भेटीवेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आज किनवट येथे होणाऱ्या पक्ष बैठकीच्या अनुषंगाने जात असताना आमदारांनी हिमायतनगर येथे थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भेटीदरम्यान स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी कशी मजबूत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


या प्रसंगी हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक विजय वळसे पाटील, शहर प्रमुख गजानन हरडपकर, उपशहर प्रमुख संतोष नरवाडे, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठेवाड, गजानन गोपेवाड, संतोष पाटील, दिलीप ढोणे, प्रकाश भैय्या, दिनेश राठोड, शेख अफरोज भाई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत आमदारांकडे कार्यकर्त्यांनी निवेदन केले. हाता तोंडाशी आलेली सोयाबीन आणि कापूस पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. या सूचनेला गांभीर्याने घेत आमदार बाबुराव कोहळीकर व आमदार आनंदराव पाटील बोंडाळकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.



