Himayatnagar : हिमायतनगर येथे आमदार बाबुराव कोहळीकर व आमदार आनंद बोंढारकर यांची धावती भेट
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या धावत्या भेटीचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
या भेटीवेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आज किनवट येथे होणाऱ्या पक्ष बैठकीच्या अनुषंगाने जात असताना आमदारांनी हिमायतनगर येथे थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भेटीदरम्यान स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी कशी मजबूत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक विजय वळसे पाटील, शहर ...
