हिमायतनगर, अनिल मादसवार| सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता नागरिकांना व्यायाम, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरातील वॉर्ड क्रमांक १ च्या नगरसेविका सौ. दर्शना शरद चायल यांच्या **‘शिव वेलनेस अँड फिटनेस सेंटर’**चा शुभारंभ ३ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.



परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे आणि ब्रह्मकुमारी शीतल दीदी यांच्या शुभहस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.



यावेळी वेलनेस व फिटनेसचे जागतिक आरोग्य सल्लागार विष्णू कदम सर, मुख्याधिकारी समाधान मासाळ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी नगराध्यक्ष अखिलभाई, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, सेक्रेटरी अनंता देवकते, विश्व हिंदू परिषदेचे श्यामजी रायेवार, डॉ. कांचन चव्हाण, सिंधू दीदी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, माजी जि.प. सदस्य समदभाई, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, नगरसेवक भारत डाके, नगरसेविका दर्शना रमेश पंडित, नगरसेवक प्रतिनिधी फेरोज खान, कलीमभाई, राजू पिंचा, डॉ. मनोहर राठोड, संजय काईतवाड, उदय देशपांडे, विलास वानखेडे, गजानन भोयर, लकडे मिस्त्री डोल्हारीकर, रामराव पाटील कार्लेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.




‘शरीराची ग्रीसिंग करण्यासाठी व्यायाम आणि सकस, संतुलित आहार गरजेचा’ सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी विविध आजार, शारीरिक समस्या तसेच असह्य वेदनांना सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. शरीर निरोगी व कार्यक्षम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. ‘शिव वेलनेस अँड फिटनेस सेंटर’च्या माध्यमातून नागरिकांना यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून महिला व पुरुषांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

नवीन सेंटरच्या माध्यमातून हिमायतनगर शहरातील नागरिकांना आरोग्य आणि फिटनेसच्या दृष्टीने एक नवी सुविधा उपलब्ध झाली असून, विशेषतः महिला व पुरुषांना आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला प्राधान्य देण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार असल्याचेही मान्यवरांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच महिला-पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका सौ. दर्शना चायल आणि चायल परिवाराचे अभिनंदन करून ‘शिव वेलनेस अँड फिटनेस सेंटर’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन चायल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शरद चायल यांनी मानले.


