Homeकृषी'Yellow alert' नांदेड जिल्ह्यासाठी उद्या ‘यलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

‘Yellow alert’ नांदेड जिल्ह्यासाठी उद्या ‘यलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसासह विजांचा कडकडाट होत असल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. झाडाखाली, विजेचे खांब, लोखंडी वस्तू, तारांचे कुंपण तसेच उंच मनोऱ्यांजवळ थांबू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. वीज चमकत असताना बाल्कनी, छत, ओटा किंवा खिडकीजवळ उभे राहणे टाळावे. तसेच शॉवरखाली अंघोळ करणे, नळ किंवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे टाळावे. पाण्यात असल्यास तात्काळ सुरक्षितपणे बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू असताना लोखंडी संरचनेच्या तंबू अथवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. बाहेर थांबण्यापेक्षा सुरक्षित घरात राहणे अधिक योग्य असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments