Wednesday, May 13

आ. संतोष बांगर यांच्यातर्फे आयोजित मागेल त्याला घरकुल व गोठा, विहीर मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

कळमनुरी/हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी येथे मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गोठा व विहीर या मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल 7428 नागरिकांनी घरकुलासाठी नाव नोंदणी केली तर हजारो नागरिकांनी गोठा व विहिरीसाठी नोंदणी केली आहे.

नागरिकांच्या घरकुल नोंदणीसाठी, गोठा व विहिरीच्या नोंदणीसाठी संपूर्ण पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या सेवेत हजर केल्याने एक एका कगदपत्रासाठी नागरिक लाभार्थ्यांना कार्यालयाच्या चकरा मारून चपला झिजवाव्या लागत होत्या. यावरही वेळेवर अधिकारी भेटत नसल्याने वेळ लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना सर्व अधिकारी एकाच छताखाली त्यांच्या सेवेसाठी आमदार संतोष बांगर यांनी उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून आमदार संतोष बांगर यांचे आभार मानले आहे.

तसेच निराधार नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन येत्या काही दिवसात निराधार नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी व त्यांना शासनाच्या श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भव्य मेळावा आयोजित करणार असल्याचे देखील आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!