उस्माननगर, माणिक भिसे l कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून उस्माननगर पोलीस पथकाने वाळुसह २ क्रेन जप्त केल्या आहेत. यावेळी दोन बोट चालक बोट घेऊन फरार झाले आहेत .


उस्मान नगर पोलीस ताण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलिस हवालदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पेदेवाड व होमगार्ड याचे पथक शीघ्र मोहिमेवर होते.


२१ ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या वर छापा टाकला. पोलिसांना पाहताच्च २ बोट मालक गोदावरी नदी पात्रातून बोटी घेऊन पळून गेले. यापेळी पथकाने १० ब्रास वाळू (४२ हजार रुपये) २ क्रेन ४५ लाख रुपये जप्त केले.


पथकाने मुखेड तालुक्यंतील खैरका येथील क्रेन चालक व मालक पांडुरंग गोविंद मोरे, हैदराबाद रेड धनेगाव वसरणी येथील क्रेनचा
चालक महश सेवालाल प्रसाद यांच्यावर कारवाई केली. उप्परोक्त २ जन व फरार झालेल्या २ बोट चालकांवर उस्मान नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोद झाला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकानी उस्माननगर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.




