क्राईमनांदेड

Mahur Acb Action : माहूर येथे मुद्रांक (बॉन्ड) विक्रेता लाचेच्या जाळ्यात

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शंभर रुपयांच्या मुद्रांक १२० रुपयाला विक्री करणे माहूर येथील मुद्रांक विक्रेत्याला चांगलेच महागात पडले. माहूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी अमृत श्रीरंग जगताप वय ५६ रा. आबासाहेब पारवेकर नगर माहूर या मुद्रांक विक्रेत्याला सापळा रचून नांदेडच्या लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

माहूर येथे मुद्रांक पेपरचा काळाबाजार सुरू होता. १०० रुपयांच्या मुद्रांकासाठी ग्राहकाकडून १२० रुपये सर्रास घेतले जायचे. याला कंटाळून तक्रारदार याने लोकसेवक यांच्याकडे ८ ऑगस्ट रोजी १०० रुपयाचे मुद्रांक खरेदीसाठी गेले होते. तेव्हा यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना १०० रुपयाचे मुद्रांक १२० रुपयास विक्री केले होते.

तक्रारदार यांना कामाची गरबड असल्यामुळे नाईलाजास्तव १२० रुपये दिले. त्यानंतर तक्रारदार यांना शेतकरी आत्मा बचतगट करीता १०० रुपये दराच्या १० मुद्रांकाची गरज होती. मुद्रांक विक्रेता अमृत जगताप हा प्रत्येक मुद्रांकाच्या पाठीमागे २० रुपये प्रमाणे २०० रुपये घेतल्याशिवाय मुद्रांक देणार नाही व अतिरिक्त रक्कम २०० रुपये हा गैरफायदा, अन्यायाची प्राप्ती असून ती देण्याची तक्रारदार यांना मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे लेखी तक्रार दिली होती.

दिनांक १२ रोजी शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना १० मुद्रांक देण्याकरीता नियमाप्रमाणे १ हजार रुपयांऐवजी १२०० रुपयांची मागणी केली. नमुद रकमेमध्ये लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे २०० रुपयाच्या गैरफायद्याची मागणी करून तडजोडअंती १५० रुपये गैरफायद्याची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. आरोपी लोकसेवक यांचेकडे रोख ४२०० रुपये व एक मोबाईल ओप्पो कंपनीचा असा गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. अमृत श्रीरंग जगताप, मुद्रांक विक्रेत्याविरुद्ध भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाई दिनांक 12/08/2025 रोजी माहूर तहसिल कार्यालयाच्या गेट समोर सापळा कारवाईचे आयोजन केले असता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 100/- रू दराचे 10 मुद्रांक (बॉण्ड पेपर) देण्याकरीता तक्रारदार यांचेकडून 1150/- रूपये स्वीकारले. त्यामध्ये 100/रुपये दराच्या 10 मुद्रांकाची एकूण किंमत 1000/- रूपये व गैरफायद्याची रक्कम 150/- रूपये अशी रक्कम पंचासमक्ष स्वीकारलेली आहे.

ही सापळा व तपास कार्यवाही अधिकारी अर्चना करपुडे, पोलीस निरीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. सापळा पथक – पोहेकाॅ संतोश वच्चेवार, पोकाॅ/ईश्वर जाधव, शिवानंद रापतवार, चापोहेकाॅ/रमेश नामपल्ले सर्व ने. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड मार्गदर्शक अधिकारी श्री.संदीप पालवे,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड परिक्षेत्र, नांदेड.डॉ.संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.पर्यवेक्षण अधिकारी . प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नांदेड. दुरध्वनी क्रमांक – 02462 253512 टोल फ्री 1064 व्हॉट्सअप नंबर 9359056840.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button