Mahur Acb Action : माहूर येथे मुद्रांक (बॉन्ड) विक्रेता लाचेच्या जाळ्यात
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शंभर रुपयांच्या मुद्रांक १२० रुपयाला विक्री करणे माहूर येथील मुद्रांक विक्रेत्याला चांगलेच महागात पडले. माहूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी अमृत श्रीरंग जगताप वय ५६ रा. आबासाहेब पारवेकर नगर माहूर या मुद्रांक विक्रेत्याला सापळा रचून नांदेडच्या लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
माहूर येथे मुद्रांक पेपरचा काळाबाजार सुरू होता. १०० रुपयांच्या मुद्रांकासाठी ग्राहकाकडून १२० रुपये सर्रास घेतले जायचे. याला कंटाळून तक्रारदार याने लोकसेवक यांच्याकडे ८ ऑगस्ट रोजी १०० रुपयाचे मुद्रांक खरेदीसाठी गेले होते. तेव्हा यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना १०० रुपयाचे मुद्रांक १२० रुपयास विक्री केले होते.
तक्रारदार यांना कामाची गरबड असल्यामुळे नाईलाजास्तव १२० रुपये दिले. त्यानंतर तक्रारदार यांना शेतकरी आत्मा बचतगट करीता १०० रुपये दराच्या १० मुद्रांकाची गरज होती. मुद्रांक व...
