Police and Excise Department ; अवैध दारू रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई होणार – NNL

नांदेड| अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या गावठी दारू, त्याचप्रमाणे बनावट व परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी व विदेशी दारू विरुद्ध पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग हे आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील, उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा आज राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. श्री विजय सूर्यवंशी यांनी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेतला.

याप्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांतदारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण (5) मासरेड आयोजित केल्या होत्या. यात, पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी दारू गाळणाऱ्या इसमांविरुद्ध एकूण (1034) केसेस केल्या असून, 59,69,519 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती दिली. तेलंगणा व कर्नाटक राज्यांचे सीमेवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सदर तपासणी नाक्यांवरून परराज्यातील अवैधपणे व कर बुडवून येणारी दारू राज्यात येऊ नये, म्हणून प्रयत्न होणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया प्रलोभन विरहित होण्याकरिता, हातभट्टी गाळप करणारी ठिकाणे, बनावट दारू बनविणारे अड्डे यांचेसह विविध प्रकारची दारू राज्यात आणणारी रॅकेट्स उध्वस्त करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील पोलीस व उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचे आयुक्त श्री सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी, उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्री तडवी, अधीक्षक श्री गणेश पाटील, श्री केशव राऊत, श्री आदित्य पवार व चारही जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button