Homeभाजयुमो शहराध्यक्ष पदी अविनाश पाटील ;व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बिडवई -NNL

भाजयुमो शहराध्यक्ष पदी अविनाश पाटील ;व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बिडवई -NNL

लोहा| लोहा नगर पालिकेची निवडणूक अकरा महिन्या नंतर होणार आहे. नगर पालिकेत भाजपची निर्विवाद सता असली तरी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून प्रचंड अंधाधुद कारभार सुरू आहे.येत्या काळात नवीन राजकीय समीकरणे जुळली जाणार (?)असे संकेत असतानाच भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

एकेकाळी शहर व तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या परिवारातील अविनाश पाटील पवार यांची भाजपा युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदी तर भाजपा व्यापार आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मीकांत बिडवई यांची निवड करण्यात आली. लोह्यातील खा चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत पदाधिकारी नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, तालुकाध्यक्ष आनंदराव शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय वाले, माजी उपाध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेता करीम शेख नगरसेवक भास्कर पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम, दीपक पाटील कानवटे, माजी नगरसेवक आप्पाराव पवार, सचिन मुकदम, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष अंबादास पवार, शहाजी पवार प्रवीण धुतमल, व्यंकटराव जंगले, यांची उपस्थिती होती.

भाजपचे निष्ठावंत जिल्हा उपाध्यक्ष केरबाजी बिडवई यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत बिडवई यांची भाजपा तालुका व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. तर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार सरचिटणीस- बाळू ( गंगाधर) पवार, ज्ञानेश्वर भिसे (उपाध्यक्ष) सोमनाथ पलिमकर प्रसाद देशमाने (उपाध्यक्ष) राजेश बोडके (उपाध्यक्ष) सोनू (शैलेंद्र) महाबले (उपाध्यक्ष) सचिव सागर पवार ,कोषाध्यक्ष – रमेश उंडाडे यांची निवड करण्यात आली.

भाजपा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्षपदी -गजानन केंद्रे सरचिटणीस -वशिष्ठ गायकवाड ,उपाध्यक्ष- मारुती दाढेल ,सचिव -सचिन गुंटे व भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत बिडवई या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments