अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL

नांदेड| शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अल्प व्याज दराने एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय किनवट यांच्यामार्फत सन 2024-25 साठी राज्य शासन पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजना व मुदत कर्ज योजनांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. हा लक्षांक प्रकल्प कार्यालय, किनवट व कळमनुरी अंतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी आहे. अनुसूचित जमातीचे सुशिक्षीत बेरोजगांरानी दिलेल्या लक्षाकांसाठी ऑनलाईन पध्दतीने www.mahashabari.in या संकेतस्थळावर कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यत सादर करावेत असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक शाखा किनवट कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक पी.सी. राठोड यांनी केले आहे.

किनवट व कळमनुरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत महिला सबलीकरण योजनेसाठी 9, कृषी आणि संलग्न व्यवसाय या योजनेसाठी 2, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी 3, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप 3, वाहन व्यवसायासाठी 2, वाहन व्यवसाय 10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लक्षापर्यत 3, लघु उद्योग व्यवसाय 3, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा 2, स्वंय सह्याता बचतगट 3 असे एकूण 30 चा लक्षांक प्राप्त झाला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button