Homeनांदेड'Lakhpati Didi' ; 11 लाख 'लखपती दीदींना' पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25...

‘Lakhpati Didi’ ; 11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा – NNL

नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, श्री. मोदी त्यांचा सत्कार करतील.

ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा श्री. मोदी जाहीर रित्या सन्मान करतील अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली.

या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल.

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दीदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दीदींचा समावेश आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments