नांदेड| येथील गुरुद्वारा लंगर साहिब येथे मोफत नेत्र शिबीर सुरू (Free eye camp starts) झाले असून, हे शिबिर उद्या ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे.

गुरुद्वारा लंगर साहिब चे प्रमुख संत बाबा नरिंदर सिंघ जी आणि संत बाबा बलविंदर सिंघ जी (कारसेवा वाले) यांच्या आशीर्वादाने संत बाबा निधान सिंघ मेमोरीयल हॉस्पीटल नांदेड यांच्या सौजन्याने व रूबी नॅशनल मेमोरीयल हॉस्पीटल जालंधर यांच्या सहकार्याने 28 ते 31 जानेवारी 2025 भव्य मोफत नेत्र शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही मोफत नेत्र तपासणी व बिना टाक्याची लेन्स शस्त्रक्रिया शिबीर आयोजीत केले आहे.

या शिबीरात जालंधरच्या सुप्रसिद्ध नेत्र तज्ञाकडुन नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया होत आहे अशी माहिती शिबीर प्रबंधक बाबा अमरजितसिंघ टाटा व वैद्यकिय अधिकारी डॉ.पी.जे. बोटलावार यांनी दिली आहे. डॉ. जॅकब प्रभाकर (नेत्र रोग तज्ञ जालंधर),डॉ. सामंथा अल्टिना (नेत्रतज्ज्ञ जालंधर),डॉ. सुभाष सॅमसन लाझारस (नेत्रतज्ज्ञ जालंधर) डॉक्टरांचे पॅनेल गरजू रुग्णांवर उपचार करणार आहेत. या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुद्वारा लंगर साहिब चे प्रमुख संत बाबा नरिंदर सिंघ जी आणि संत बाबा बलविंदर सिंघ जी (कारसेवा वाले) यांच्या वतीने केले आहे.
