उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथे दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह सिडको ( नविन नांदेड ) येथे रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले असून ‘आंबेडकरवाद आणि मातंग समाज’ या विषयावर आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रा. राजू सोनसळे हे व्याख्यान देणार आहेत. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचे संस्थापक तथा साप्ताहिक दावेदार या वृत्तपत्राचे संपादक बा.रा. वाघमारे यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन केले जाते व्याख्यान मालेचे हे सोळावे वर्षे आहे.
नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. गणपत वाडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत, तर अॅड. चंद्रप्रकाश सांगवीकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सिडको, नांदेड आणि कंधार येथील डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास दररोज अभिवादन करणा-या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे प्रदेशाध्यक्ष डी.एस. वाघमारे, जयप्रकाश तथा पापा वाघमारे, डॉ. भास्कर औराळकर, सतीश पाटील बस्वदे, दत्ता पाटील खानसोळे, पी.बी. वाघमारे कोलंबीकर, वाय. जी. वाघमारे मरशिवनीकर, विलासदादा गजभारे, पत्रकार रमेश ठाकूर, प्रा. जी.एल. सूर्यवंशी, प्रा. ब. ना. गोईनवाड, प्रा. सी.एल. कदम, तुकाराम टोम्पे, एन. डी. गवळे, माधवराव आंबटवाड, आर.जे. वाघमारे, नागेश वाघमारे, पत्रकार राजेश भोळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखाराम गजले, गुणाजी बुचडे, सूर्यकांत शिंदे, बबन बुचडे, संदीप गायकवाड, पांडुरंग आंबटवाड, नामदेव काळे, श्याम कांबळे पान भोसीकर, धनाजी वाघमारे पानभोसीकर, प्रा. यशवंत गादेकर, रमेश सूर्यवंशी गोणारकर, एस.आर. मोरे, भगवान बावळे, चंद्रकांत बुचडे, संदीप सोनटक्के आदी परिश्रम घेत आहेत.