Ravana Baba Waghmare : दोन ऑक्टोबर रोजी रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला -NNL
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथे दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह सिडको ( नविन नांदेड ) येथे रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले असून 'आंबेडकरवाद आणि मातंग समाज' या विषयावर आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रा. राजू सोनसळे हे व्याख्यान देणार आहेत. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचे संस्थापक तथा साप्ताहिक दावेदार या वृत्तपत्राचे संपादक बा.रा. वाघमारे यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन केले जाते व्याख्यान मालेचे हे सोळावे वर्षे आहे.
नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. गणपत वाडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत, तर अॅड. चंद्रप्रकाश सांगवीकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सिडको, नांदेड आणि कं...
